पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 22 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 723 सक्रिय रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 745 सक्रिय रुग्णांवर उपचार केले जात आहे.
कोरोनाचे रुग्ण सध्या पुन्हा वाढू लागले आहे. शहरात शनिवारी (दि. 25) दिवसभरात 79 बाधित रुग्ण आढळले. तर, 72 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शनिवारी (दि.25) दिवसभरात 852 संशयित रुग्णांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आजअखेर एकूण 3 लाख 61 हजार 270 बाधित रुग्ण आढळले. तर, 3 लाख 56 हजार 632 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 4 हजार 624 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.