पिंपरी : कोरोनाचे गुरुवारी (दि. 18) दिवसभरात 57 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 88 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे. गुरुवारी दिवसभरात 587 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 20 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 360 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहेत.
आज दिवसभरात 1 हजार 127 नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 69 हजार 114 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 64 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 4 हजार 628 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.