पिंपरी : घरासमोर पार्क केलेली चार वाहने अज्ञात इसमांनी पेटवून दिली. ही घटना मंगळवारी (दि. 2) पहाटेच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून घरासमोर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना आग लावली.
यामध्ये तीन दुचाकी आणि एका कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पोलिसांना एका सीसीटीव्हीमध्ये एक संशयित कार दिसून आली आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वाहने पेटवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.