पुणे

पिंपरी : कामशेतमध्ये अद्यापही उन्हाचा तडाखा

अमृता चौगुले

कामशेत : नाणे मावळ परिसरात पावसाने अजूनही सुरुवात केली नाही. पावसाळ्याचे दिवस असूनही उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे; तसेच उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

शेतामध्ये शेतकर्‍यांनी भाताच्या रोपांची पेरणी करण्यात आहे; मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाचा तडाखा अजूनही कायम असल्याने भात रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भात रोपांची पुन्हा पेरणी करावी लागते की काय असा प्रश्न शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे.

मावळ भाग हा भात शेतीचा मानला जातो. नाणे, कांब्रे, गोवित्री, उकसान, पठार, पाले, पठार या भागात प्रामुख्याने इंद्रायणी, कोळम, समृद्धी, सोनम, तृप्ती आदी भाताच्या वाणांचे पीक घेतले जाते. यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. जूनच्या सुरुवातीस पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांमध्ये च़ितेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस वेळेवर सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; हवामान खात्याचाही अंदाज चुकला असून आकाशाकडे डोळे लावून पाहण्या शिवाय शेतक-यांकडे पर्याय नाही.

SCROLL FOR NEXT