पुणे

पिंपरी : कांदा, बटाटा, मटारची आवक वाढली

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व मोशी येथील उपबाजारात कांदा, बटाटा, मटारची आवक वाढली आहे. दरातही थोड्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. मोशी येथील घाऊक बाजारात कांद्याची आवक 477 क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा कांद्याची आवक 130 क्विंटलने वाढली आहे. बटाट्याची आवक 634 क्विंटल एवढी झाली असून, 40 क्विंटल आवक वाढली आहे.

तर मटारची आवक 21 क्विंटलवरून 45 क्विंटल एवढी आवक झाल्याने 24 क्विंटलची वाढ झाली आहे. लिंबाची आवक 19 क्विंटल इतकी झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक गेल्या आठवड्यापेक्षा 210 क्विंटलने वाढली असून, ती 526 क्विंटल एवढी झाली आहे. तर काकडीची 111 क्विंटल आवक झाली आहे. घाउक बाजारात टोमॅटाचा भाग 15 ते 18 रूपये प्रतिकिलो, तर काकडी 15 ते 16 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

फळभाज्यांची आवक 160 क्विंटलने वाढली असून, 3134 क्विंटल एवढी झाली आहे. तर फ ळांची आवक 148 क्विंटल एवढी झाली आहे. पालेभाज्यांची 33440 गड्डयांची आवक झाली होती. सलग सुट्या आणि श्रावण महिन्यामुळे भाजी पाल्याची खरेदीदेखील वाढली असून, खरेदीसाठी पिंपरीतील तसेच शहर परिसरातील भाजी मंडईत ग्राहकांची गर्दी होत आहे.

SCROLL FOR NEXT