पिंपरी : ओएलएक्सवर वस्तू विकण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका तरुणाची 80 हजारांची फसवणूक केली. ही घटना 8 ऑगस्टला दिघी येथे ऑनलाइन घडली. बिपिन केशव प्रसाद सिंह (28, रा. गायकवाडनगर दिघी) यांनी गुरुवारी (दि. 11) दिघी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, अमित कुमार, बँक खातेधारक शीलादेवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
आरोपी अमितकुमारने फ्रीज, वॉशिंग मशिन विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. दरम्यान, ती जाहिरात पाहून फिर्यादी यांनी आरोपीला संपर्क केला. अमित कुमार याने फिर्यादी कडून शीलादेवी नावाच्या बँक खात्यावर 80 हजार घेतले. त्यानंतर फिर्यादींना वॉशिंग मशीन, फ्रीज न देता फसवणूक केली.