पुणे

पिंपरी: इंधन दर वाढीमुळे उन्हाळ्यात टुरिस्ट व्यावसायिकांना ‘ब्रेक’

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

सध्या वाहनांच्या इंधन दराने शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्याचा परिणाम थेट पर्यटन व्यवसायावर झाला आहे. टुरिस्टच्या गाड्यांची मागणी यामुळे कमी झाली असून, टुरिस्ट व्यावसायिकांसाठी यंदाचा उन्हाळा तोट्यात गेला आहे.

डिझेल दर वाढीमुळे अनेक टुरिस्ट गाड्यांनी दर वाढवले होते. पर्यटन कंपन्यांनीदेखील टूर पॅकेजच्या किमती वाढवल्या आहेत. टुरिस्ट आणि पर्यटन व्यवसायाला कोरोनामुळे मोठा फटका बसला होता. सर्व निर्बंध हटल्यावर पर्यटन व्यवसायाला चालना मिळत होती. तोच इंधन दर वाढ, उन्हाचा पारा यामुळे पुन्हा पर्यटनाकडे नागरीकांनी पाठ फिरवली.

यंदा मागणी असणारे पर्यटन: 1) देव दर्शन 2) महाबळेश्वर 3) कोल्हापूर 4) गोवा
निर्बंध हटवल्यानंतर सुट्टीमध्ये पर्यटन वाढेल अशी खाजगी टुरिस्ट व्यावसायिकांची अपेक्षा होती. परंतु, यंदाच्या उन्हाळी सुट्टीत टुरिस्ट व्यावसायिकांचा व्यवसाय झालाच नाही. तर जे ग्राहक टुरिस्टच्या गाड्या घेऊन पर्यटनाला गेले त्यांनी 1 किंवा 2 दिवसाचा बेत
आखला होता.

'या वर्षी उन्हाळ्यात व्यवसाय भरपूर मिळेल असे वाटले होते. परंतु म्हणावा तसा व्यवसाय झाला नाही, गाडी जागेवर उभी राहू नये म्हणून येतील तशा ट्रीप स्वीकारल्या आहेत,'

                        – टुरिस्ट व्यावसायिक

https://youtu.be/7KwsutS10qQ

SCROLL FOR NEXT