पुणे

पिंपरी : आषाढीनिमित्त आज एसटीच्या 20 बसेस सोडणार

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी राज्याच्या कानाकोपर्यातून पंढरपूरला जातात. शहरातूनही हजारोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळा विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतो. वारक-यांच्या तसेच भाविकांच्या सुविधेसाठी शहरातील वल्लभनगर आगारातून शनिवार (दि. 9) रोजी वीस गाड्या पंढरपूरसाठी धावणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर बसडेपोमधून आषाढीवारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणार्या भाविकांसाठी एसटीच्या वीस ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.डेपोच्या माध्यमातून समूह बुकिंगची देखील सोय करण्यात आली आहे. कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षापासून वैष्णवांना आपल्या लाडक्या पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेता आले नव्हते.

यामुळे दोन वर्षानंतर दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या अधिक आहे. यामध्ये वारकर्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने जुलै सात ते चवदा या तारखांमध्ये ज्यादा गाड्या त्यांच्या सेवेसाठी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी आगारामधून दहा ज्यादा गाड्या सोडल्या होत्या. शनिवारी आणि रविवारी देखील वीस गाड्या सोडणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT