पुणे

पिंपरी : आयटीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची संगणक अभियंत्यांना गोडी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) काम करणार्‍या संगणक अभियंत्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची गोडी लागली आहे. त्यामुळे संगणक अभियंते आता नवीन नोकरी स्वीकारताना घरून काम करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करीत आहेत.

कोरोनाच्या कालावधीत बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे त्याची सवय झालेल्या संगणक अभियंत्यांना आता कार्यालयात जाऊन काम करणे जड जात आहे. शहरातील तळवडे आणि शहरालगतच्या हिंजवडी येथे अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये 5 दिवसांचा आठवडा आहे.

कंपन्यांकडून सध्या 'हायब्रीड' मॉडेलवर काम केले जात आहे. अभियंत्यांनी 3 दिवस घरून तर, दोन दिवस कंपनीत येऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि, बहुतांश आयटी अभियंत्यांना घरून काम करण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे ते 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे करीत आहेत.

कंपन्यांमध्ये सध्या सुरू असलेले काम
आयटी कंपन्यांमध्ये सध्या तीन पद्धतीने काम सुरू आहे. काही आयटी अभियंते कंपनीत पूर्णवेळ येऊन काम करीत आहेत, तर काही अभियंते 'वर्क फ्र ॉम होम'द्वारे काम करीत आहेत. तर, काही कंपन्यांमध्ये 3 दिवस घरून तर दोन दिवस कंपनीत येऊन काम या 'हायब्रीड' मॉडेलनुसार काम करण्याची अपेक्षा केली जात आहे. 'वर्क फ्रॉम होम' कामासाठी कंपनीतील प्रकल्प व्यवस्थापकांनी परवानगी दिली तरच आयटी अभियंत्यांना घरून काम करण्याची मुभा मिळते. मात्र, जर कामाची गरज म्हणून कंपनीतच येऊन काम करण्यास सांगितले तर त्यांना लवचिक धोरण ठेवत कंपनीत येऊन पूर्णवेळ काम करावे लागत आहे.

कंपन्यांमध्ये सध्या आयटी अभियंते 'वर्क फ्रॉम होम'ला जास्त प्राधान्य देत आहे. त्याचबरोबरीने कंपनीच्या मागणीनुसार काही अभियंते कार्यालयात जाऊनही काम करतात. तर, काही अभियंत्यांना 3 दिवस घरून तर दोन दिवस कंपनीत येऊन काम या 'हायब्रीड' मॉडेलनुसार काम करावे लागते. 'वर्क फ्रॉम होम' काम करताना 5 ते 8 तास काम करावे लागते.
– जगदीप जैन, सॉफटवेअर इंजिनिअर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT