पुणे

पिंपरी :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अमृता चौगुले

पिंपरी : झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि. 27) मध्यरात्री अडीचच्या सुमारास सदगुरुनगर, भोसरी येथे घडली.शिवराज शंकर मचकुरे (रा. मुचलम, ता. बसव कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी घरात झोपलेली असताना मध्यरात्री आरोपी तिच्या घरात आला. त्याने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

SCROLL FOR NEXT