पुणे

पिंपरी :80 हजारांची बुलेट टपरीसमोरून पळवली

अमृता चौगुले

पिंपरी : बनावट चाव्या बनवण्याच्या टपरीसमोर पार्क केलेली बुलेट अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी शिवम कैलास हजारे (24, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी मंगळवारी (दि .14) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी मामाच्या नावावर असलेली 80 हजार रुपये किमतीची बुलेट सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास संत तुकाराम नगर येथील चाव्या बनवण्याच्या टपरीसमोर पार्क केली. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची बुलेट चोरून नेली.

SCROLL FOR NEXT