पुणे

पारगाव : मेंढपाळांची चार्‍याची चिंता मिटली

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेली महिनाभर पडलेल्या पावसाने मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या चार्‍याची चिंता मिटली आहे. डोंगर माळरानावर हिरवे गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या व जनावरे डोंगर माळरानावर चरताना दिसत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास एक महिना सतत पाऊस पडला. हा पाऊस शेतकर्‍यांप्रमाणेच मेंढपाळांनादेखील अतिशय फायदेशीर ठरला.

पावसामुळे डोंगर माळरानावर हिरव्या गवताचा फुटवा मोठ्या प्रमाणात झाला आहे. हे गवत शेळ्या-मेंढ्या जनावरांसाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळे मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांची चार्‍याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात वळती, शिंगवे, भागडी, थोरांदळे परिसरात अनेक धनगर मेंढपाळ आता कायमचे वास्तव्यास आहेत. यंदा पावसाने सर्वत्र समाधानकारक हजेरी लावल्याने मेंढपाळांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

SCROLL FOR NEXT