पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्याने पायी जात असलेल्या पादचार्याच्या खिशातील 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटन 1 जून 2022 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कृष्णानगर, चिखली येथे घडली.
याप्रकरणी कुलोकेश गोपाळ माळी (19, रा. शिवमुद्रा हाउसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी गुरुवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 1 जून रोजी स्पाईन रोड, कृष्णानगर येथून रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमटकर करीत आहेत.