पुणे

नो-एंट्रीतील प्रवेशामुळे अपघाताचा धोका; ‘एमएसईबी’ पर्यंतचा रस्ता खुला करण्याची मागणी

अमृता चौगुले

खडकी : पुढारी वृत्तसेवा: खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर आता नवे दुभाजक टाकण्यात आले आहेत. हे दुभाजक नेहरू उद्यानापर्यंत नेण्यात आले असून, पुढे रस्ता बंद करण्यात आला आहे. खडकी बाजारात येणार्‍या नागरिकांना मोठा वळसा पडत असून नागरिक, महिला, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सुमारे शंभर मीटरचा रस्तादुभाजक केल्यास नागरिकांची सोय होणार असून, प्रशासनाने त्वरित याबाबत पावले उचलावीत, अशी मागणी समस्त खडकीकर करीत आहेत.

बोर्डाच्या हद्दीमध्ये डॉ. आंबेडकर रस्त्यावर नव्याने दुभाजक तयार करण्यात आले आहेत. नवीन होळकर पुलापासून दुभाजक नेहरू उद्यानापर्यंत (त्रिकोणी गार्डन) आणण्यात आले आहेत. मात्र, नेहरू उद्यानापासून एमएसईबी चौकापर्यंत सुमारे शंभर मीटरचा उर्वरित रस्ता बंद करण्यात आला आहे. नेहरू उद्यानाजवळ पत्रे लावून रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT