वालचंदनगर : निमसाखर (ता. इंदापूर) नजीक असलेल्या निरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्याचे 78 ढापे चोरून नेल्याची घटना घडली. या परिसरात निरा नदीवर निमसाखर व पळसमंडळ या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. पावसाळ्यापूर्वी बंधार्याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात. चालू वर्षीही बंधार्याचे वापरायोग्य 511 ढापे काढून निमसाखर हद्दीत ठेवण्यात आले होते.
याशिवाय याच ठिकाणी खराब झालेले 363 ढापे काढून ठेवण्यात आले होते. गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री काही चोरट्यांनी यातील वापरायोग्य 78 ढाप्यांची चोरी केली. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पाटबंधारेचे शाखाधिकारी रतन झगडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.