पिंपरी : निगडी येथील ओटास्कीम परिसरात मध्य रात्री दोन चोरट्यांनी एका व्यक्तीजवळील सोने व रोख रक्कम मिळून एकूण तेरा हजारांची लूट केली. ही घटना शनिवारी (2 रोजी) रात्री 1 वाजता घडली.
फिर्यादी विजय राजेश शिंदे (वय 23, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) हे रात्री घरी जात असताना, आरोपी किशोर व बंड्या यांनी अंधाराचा गैरफायदा घेत फिर्यादीस मारहाण करीत पैशाची मागणी केली. पाकिटातील रोख रक्कम पाच हजार व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे क्रॉस, असा एकूण तेरा हजारांचा ऐवज लुटला. निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.