पुणे

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नित्याचीच..

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा:  अवजड वाहनांच्या प्रचंड वाढलेल्या रहदारीमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहनांच्या रांगा कमी होत नसल्याची स्थिती समोर येत आहे. पूर्वी केवळ सकाळी आणि सायंकाळी वर्दळ वाढल्यानंतर होणारी कोंडी आता दिवसभर केव्हाही या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

रविवारी (दि. 12) दुपारी तीन वाजेपासून पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. चाकण पंचक्रोशीत अहोरात्र अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सतत मोठी वाहतूक कोंडी होते. चाकण भागात तळेगाव चौक, आंबेठाण चौक, आळंदी फाटा, चिंबळी फाटा या परिसरात ही समस्या कायम आहे.

चाकण वाहतूक विभागाने केलेल्या काही उपाययोजना मोठी कोंडी फोडण्यासाठी काही प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, वाहनांची विशेषतः अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलिसांचे उपाय तोकडे ठरत आहेत. दरम्यान, माणिक चौक ते मुटकेवाडी दरम्यान वाहतूक विभागाने अवजड वाहतूक वळवली आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. पालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे डोळेझाक केलेली असल्याने या रस्त्यावरदेखील अनेकदा मोठी कोंडी होत असल्याची स्थिती समोर येत आहेत.

SCROLL FOR NEXT