नानगाव; पुढारी वृत्तसेवा: नानगाव (ता. दौंड) येथे बुधवारी (दि. 3) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरून पाणीच पाणी वाहू लागले. दिवसभर वातावरणात उकाडा होता. त्यामुळे चांगला पाऊस होणार, असा अंदाज नागरिक व्यक्त करीत होते.
जोरदार पाऊस गेले दोन आठवडे पडलाच नव्हता. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील कामांना वेग आला होता. खुरपणीची कामे देखील सुरू झाली होती. मात्र, पावसामुळे पुन्हा एकदा शेतातील कामे खोळंबून राहणार आहेत.