नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन दिवसांत नसरापूरमध्ये दोघांचे संशयास्पद मृतदेह आढळले असून, यात एक वेल्ह्यात सेवा बजावणारे आरोग्यसेवक, तर दुसरा वयोवृद्ध मजूर आहे. दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून, नातेवाइकांची याबाबत तक्रार नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून दाखल केले आहे. चंद्रकांत उत्तम आडे (वय 36, मूळ रा. नांदेड, सध्या रा. स्वामी समर्थनगर, नसरापूर) असे अकस्मात मयत झालेल्या आरोग्यसेवकाचे नाव असून, ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री उशिरा उघडकीस आली.
गावाहून त्यांची पत्नी व नातेवाईक यांनी चंद्रकांत आडे यांना वारंवार फोन करीत होते. मात्र, फोन रिसिव्ह करत नसल्याने त्यांच्या पत्नीने शेजार्यांना फोन करून सांगितले. पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी आडे मयत अवस्थेत आढळून आले. तसेच लोहगाव येथून मंगळवारी (दि. 12) निघून आलेले वयोवृद्ध रंगनाथ शंकर लंगडे (वय 80) यांचा मृतदेह नसरापूर बसस्थानकात गुरुवारी (दि. 14) सकाळी मृतावस्थेत आढळून आला.