पुणे

नसरापूर : एकोणचाळीस लाखांचा दारूसाठा सारोळा येथे जप्त

अमृता चौगुले

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्कच्या सासवड विभागाच्या पथकाने पुणे-सातारा महामार्गावर विदेशी दारू व बिअरचा सुमारे 39 लाख 18 हजार रुपयांचा साठा जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी दारू व ट्रकसह (आरजे 32 जीए 5956) 49 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक केली. सुरेश चंद्रा कलाल (वय 36, रा. सियाल मांग्री घाटी, लसाणी, ता. देवगड, जि. राजसमंद), किसनलाल प्यारचंद खटिक (वय 28, रा. धानेन, ता. कोमलगढ, जि. राजसमंद) अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. ही कारवाई शुक्रवारी ( दि. 15 ) सायंकाळी सारोळा ( ता. भोर) येथील सातारा महामार्गावरील हॉटेल नानाचीवाडीसमोर करण्यात आली.

गोवा राज्यात फक्त विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक सातारा महामार्गावरून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सी. बी. रजपूत यांना मिळाली. त्यानुसार सासवड विभागाच्या पथकाने सारोळा गावच्या हद्दीत उड्डाणपुलाजवळ सापळा लावला. संशयित ट्रकची तपासणी केली असता, त्यात गोवा बिअरचे 50 बॉक्स, विदेशी दारूचे 500 बॉक्स आढळले. पोलिसांनी दारूसह ट्रक, मोबाईल, असा 49 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक पी. सी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक राजेंद्र झोळ, आर. एम. सुपेकर, संदीप मांडवेकर, अक्षय म्हेत्रे, भागवत राठोड, रणजित चव्हाण आदींनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT