पुणे

ध्येयवादी कृतिशीलतेनेच सामाजिक आरोग्य टिकते; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'सामाजिक विकास व उन्नतीचे कार्य करणारे विविध क्षेत्रातील गुणवंत आपल्या ध्येयवादी कृतिशीलतेने समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक आरोग्य राखतात,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. जनकल्याण बहूद्देशीय फाउंडेशन पुणेतर्फे 'सोलापूरभूषण' व 'पुणेरत्न' पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, इंडसचे अजित वाळे पाटील, चेतना जाठवडेकर, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराव पाटील, अभय ऐतवडेकर आदी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या, 'पुरस्कार दिल्यानेच प्रत्येक जण काम करतो, असे नाही. मात्र, सामाजिक ॠण व्यक्त करणार्‍यांना सन्मानित करणे आपले कर्तव्य आहे. सुख-दु:खाच्या धाग्याने महावस्त्र तयार होत असते. तेच पांघरून प्रत्येक जण स्वत:साठी आणि काही जण समाजासाठी कार्य करतात, त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे.'

फाउंडेशनच्या शोभा पाटील, सुशीला निंबाळकर, भाऊसाहेब निंबाळकर, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, शैलेंद्र पाटील आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT