पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी केली. 
पुणे

धावपट्टी विस्तारामुळे वाढेल आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी: खासदार गिरीश बापट

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'पीएमसी आणि आयएएफच्या प्रतिनिधींनी धावपट्टीच्या पश्चिमेकडील भूसंपादन पूर्ण करावे, जेणेकरून मोठ्या विमानांच्या लँडिंगसाठी सध्याची धावपट्टी वाढवता येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सुधारेल,' असे मत विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी खासदार बापट यांनी शनिवारी केली. त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि इतर भागधारकांच्या प्रतिनिधींसह पुणे विमानतळ आणि परिसरात सुरू असलेल्या विविध प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा यावेळी आढावा घेतला.

याप्रसंगी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळावरील अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बापट यांनी नवीन टर्मिनल बिल्डिंगच्या जागेचीही पाहणी केली. यात आजपर्यंत 60 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. यासोबतच त्यांनी या प्रकल्पातील अडथळ्यांची माहिती घेतली आणि 'पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे नियोजन आहे.

त्याकरिता आणि पुणे विमानतळावरील वाढत्या प्रवासी वाहतुकीची पूर्तता करण्याकरिता नवीन टर्मिनल इमारत बांधणे गरजेचे आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. मल्टिलेव्हल पार्किंगमुळे विमानतळावरील पार्किंगची समस्या लवकरच सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 'पालिका, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी पुणे विमानतळाशी समन्वय साधून विमानतळ ते विमाननगर मार्गे 2 हजार 350 चौरस मीटर हवाई दलाच्या जमिनीवरील शिल्लक भाग पूर्ण करून रस्ते जोडणीचे काम हाती घ्यावे,' असे आवाहनही त्यांनी
यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT