पुणे

धायरी : नवले हॉस्पिटलजवळ मैलापाणी; नवले पुलापर्यंत आला लोंढा

अमृता चौगुले

धायरी, पुढारी वृत्तसेवा: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गालगत नर्‍हे सेवा रस्त्यावर नवले हॉस्पिटल कॉर्नरवर ड्रेनेज तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मैलापाणी रस्त्यावरून वाहत आहे. या मैलापाण्याने येथून जाणारे-येणारे नागरिक, महिला कामगार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी हैराण झाले आहेत. या मैलापाण्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या परिसरात रुग्णालय व वैद्यकीय कॉलेज असल्यामुळे रुग्ण, नातेवाईक, विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.

येथून जाताना नागरिकांच्या अंगावर वाहनांचे मैलापाणी उडत आहे. दिवसभर येथील दोन ड्रेनेज चेंबरमधून अक्षरशः नागरिकांची विष्टा रुग्णालयाच्या रस्त्याने वाहत आहे. हे विष्टायुक्त मैलापाणी नवले हॉस्पिटल कॉर्नरपासून सर्व्हिस रस्त्याने नवले पुलापासून हॉटेल विश्वासपर्यंत एक किलोमीटर अंतर पार करून पुढे वाहत आहे. यामुळे सर्वच वैतागून गेले असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या मैला पाण्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. यामुळे ताबडतोब येथून वाहणारे मैलापाणी बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सुशांत कुटे, माजी उपसरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT