पुणे

धक्कादायक ! वाकसई स्मशानभूमीत पाटीभर लिंबाचा उतारा

अमृता चौगुले

कार्ला : जग आधुनिकतेकडे तसेच तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना मावळ तालुक्यात अजूनही अंधश्रद्धा कायम असल्याचे दिसत आहे. वाकसई स्मशानभूमीत पाटीभर कापलेली लिंबे गुलाल, अबीर तसेच कुंकू, टाचण्या लावून ठेवलेली आढळली आहेत.
आज समाज सुशिक्षित झाला असे म्हटले जाते.

परंतु, आजही ग्रामीण भागात काहीजण चांगले घडविण्यासाठी भोंदूबाबांच्या नादाला लागत असल्याचे दिसत आहे. अनेकदा असे प्रकार उघडकीस येऊनदेखील अंधश्रद्धा कमी होताना दिसत नाही. मावळ तालुक्यात अनेकदा असे प्रकार घडले असून स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारामुळे वाकसई येथील नागरिक भयभीत झालेआहेत. पोलिस प्रशासनाने तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याची चौकशी करुन असे प्रकार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाकसई ग्रामस्थांनी
केली आहे.

SCROLL FOR NEXT