पुणे

दी कोणार्क अर्बन, शिरपूर मर्चंट बँकेवर प्रशासक; आरबीआयकडून संचालक मंडळ बरखास्त

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत अनियमितता आढळल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करीत ठेवीदारांच्या हिताला बाधा आणल्याचे स्पष्ट झाल्याने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील दी कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उल्हासनगर आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी 1960 नुसार बँकेचे कामकाज पाहण्यासाठी दी कोणार्क बँकेवर कल्याण येथील सहकार उपनिबंधक विशाल जाधवर यांची, तर शिरपूर मर्चंट बँकेवर नाशिक येथील विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या वैधानिक तपासणीअंती दोन्ही बँकांकडून कामकाजात सातत्याने अनियमितता व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले. बँकेचे कामकाज ठेवीदारांच्या हिताला बाधक अशा पद्धतीने चालवले गेल्याने बँकेच्या संचालक मंडळ जबाबदारीबाबत अपयशी ठरल्याचा ठपकाही आरबीआयने ठेवला आहे. आरबीआयने 25 एप्रिल रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शैलेश कोतमिरे यांनी दोन्ही बँकांवर प्रशासकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले असल्याची माहिती सहकार विभागातून मिळाली. प्रशासकांनी बँकांचे कारभार स्वीकारून सहकार आयुक्तालयास अहवाल सादर करण्याचेही आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT