दिवे; पुढारी वृत्तसेवा: दिवे घाट परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने घाटातील रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. छोट्या दरडींचा राडारोडा गटारात पडलेला असल्याने गटारे तुंबली आहेत. पाणी रस्त्यावर येऊन जागोजागी रस्ता खचला आहहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे अपघात होत असून, दिवे घाट प्रवासासाठी धोक्याचा झाला आहे.
गुरुवारी रात्री अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दिवे घाटात हाहाकार माजला. बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी वाहत होते. त्यातून वाहनचालक कसाबसा मार्ग काढत होते.