दिवे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असणार्या दिवे घाटात सध्या प्रचंड खड्डे पडले असून, वाहनचालकांना गाडी चालवितांना कसरत करावी लागत आहे. विषेशत: दुचाकी वाहनचालकांना तर सर्कस करतच घाट पार करावा लागत आहे.
गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे घाटात बरेच खड्डे पडले असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही, तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर दिवे घाटातील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवाशी तसेच वाहनचालकांनी केली आहे.