तीन माजी सैनिकांना ८० लाखांचा गंडा File Photo
पुणे

Pune News | तीन माजी सैनिकांना ८० लाखांचा गंडा

मोनिका क्षीरसागर

पुणे : गुंतवणूक केलेली रक्कम वीस महिन्यांत डबल करून देतो, तसेच गुंतवणुकीच्या दहा टक्के रक्कम दरमहा परत देण्याच्या बहाण्याने तीन माजी सैनिकांना ७९ लाख ८१ हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, चंदननगर पोलिसांनी समृद्ध भारत ट्रेडिंग सर्व्हिसच्या नरेंद्र बाळू पवार (वय ४१, रा. मालेगाव, नाशिक), गणेश कडुवा माळोदे (वय ४०, रा. औरंगाबाद), प्रफुल कांबळे (वय ४०, रा. पुणे), शुभांगी नरेंद्र पवार (वय ३६, रा. मालेगाव, नाशिक), स्वप्निल ठाकरे (वय ३८, रा. मुंबई), संदीप अशोक मुळे (वय ३८, रा. पुणे), विजय खरात, मिथील काळे अशा आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा

गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलीप भाऊसाहेब औटी (वय ४०, रा. पारनेर, ता. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औटी हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. त्यांना समाज माध्यमाद्वारे समृद्ध भारत ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीची माहिती मिळाली होती. खराडी परिसरात आरोपींनी कंपनीचे कार्यालय उघडले होते. आरोपी नरेंद्र पवार हा मुख्य सूत्रधार आहे, त्याची ही कंपनी आहे. कंपनीच्या मार्फत लोणावळा येथे सेमिनारचे आयोजन केले होते. तेथे औटी आणि इतर दोघांनी आरोपींच्या कंपनीत गुंतवणूक केली.

पुण्यात आत्तापर्यंत २८ जणांची फसवणूक

नरेंद्र पवार हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यंत त्याने २८ जणांची गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. पवार याच्यावर इतर शहरातसुद्धा गुन्हे दाखल असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT