पुणे

ताथवडे : नदी प्रदूषित करणार्‍या कंपनीला पालिकेची नोटीस

अमृता चौगुले

ताथवडे : काळेवाडी बीआरटी रोड येथील नदीपात्रात बेकायदेशीर भराव टाकल्याबाबत व मैलामिश्रीत सांडपाणी सोडून दिल्याप्रकरणी पालिकेने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाले होते. तसेच, पावसाळ्यामध्ये पुराचा धोका निर्माण होऊ झाला होता. या संदर्भातील वृत्त 'दैनिक पुढारी'मध्ये प्रकाशित झाल्यानंतर महापालिकेने मे. खिलारी इन्फ्रा. प्रा. लिमिटेड या कंपनीला नोटीस पाठविली आहे.

तसेच, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी कंपनीला खुलासा करण्यास सांगितले आहे. नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांबाबत ग प्रभाग कार्यालयास कळविले आहे. याविषयी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी सांगितले, की संघटनेच्या वतीने नदी प्रदूषित होत असल्याची तक्रार महापालिका आयुक्त राजेश पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पालिकेने संबंधित कंपनीला नोटीस पाठविली आहे.

SCROLL FOR NEXT