तळेगाव स्टेशन : घोरावडी रेल्वे स्टेशन परिसरातील लोहमार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वे गाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशन रे.कि.मी.नं.159/32-34 जवळ रेल्वे गाडीची धडक बसून एका अज्ञात व्यक्तीचा (वय अंदाजे 40 वर्षे) मृत्यू झाला.
अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, उंची 5 फूट 9 इंच नाक सरळ, डाव्या हाताच्या दंडावर सिंहाचा चेहरा गोंदलेला असून, डोक्याचे केस काळे पांढरे बारीक आहेत. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व तपकिरी रंगाची पॅन्ट, पायात काळ्या रंगाचे बूट आहेत, असे मृत झालेल्या व्यक्तीचे वर्णन असून, या संदर्भात कोणास माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.