पुणे

तळेगाव स्टेशन परिसरात विद्युत पुरवठा खंडीत

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : चौकात सोमवारी(दि.०८) पहाटे अज्ञात वाहनाने वीज महावितरण च्या पोलला धडक दिली असुन पोल वाकडा होवुन वीजवाहिन्या तुटल्या आहेत यामुळे तळेगाव स्टेशन भागात स्टेशन चौक, यशवंत नगर, वतन नगर, मनोहर नगर, तपोधाम कॉलनी, इंद्रायणी वसाहत, जोशीवाडी, वराळे,माळवाडी आदी ठिकाणचा विद्युत पुरवठा पहाटेपासुन खंडीत झाला आहे.

वीज महावितरणचे अधिकारी, कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करणेसाठी भर पावसात प्रयत्न करीत आहेत. १२ वा. सुमारास वीज पुरवठा सुरळीत होईल असे महावितरणचे सहाय्यक अमियंता विक्रम राठोड,विजय कांबळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT