पुणे

तळेगाव शहर शिवसेनेच्या वतीने निषेध सभा

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव शहर शिवसेनेच्या वतीने कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तळेगाव स्टेशन भागात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध सभा घेऊन निषेध करण्यात आला आणि चिमुकलीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी तळेगाव शहर प्रमुख (स्टेशन )प्रा.महादेव खरटमल ,गाव विभाग शहर प्रमुख सिद्धनाथ नलावडे ,कार्याध्यक्ष सतीश गरुड ,महिला संघटिका, रूपाली आहेर ,संगीता सोनवणे, कैलास सगळे, आदी उपस्थित होते

SCROLL FOR NEXT