तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव स्टेशन परिसरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. वीज महापारेषण, महावितरण नवीन समर्थ विद्यालय, कांतीलाल शाह विद्यालय,जेष्ठ नागरिक संघ स्वराज नगरी, वतन नगर आदी ठिकाणी झेंडा रोहण आणि स्वागत दिनानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला.
इंद्रायणी महाविद्यालयाची दुचाकी, चारचाकी वाहनांसमवेथ भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे सुमारे १५०० जणांनी सहभाग घेतला होता. सदर शोभायात्रा, इंद्रायणी महाविद्यालयापासुन, इंद्रायणी वसाहत, हिंदमाता भुयारी मार्ग, जिजामाता चौक, श्री मारुती चौक, तळेगाव स्टेशन चौक अशी निघाली होती.
रॕलीत भारत माता कि जय! वंदे मातरमच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. मिरवणूक मार्गावरील नागरिक आपापल्या घरासमोरुन गच्चीवरुन, गॕलरीतून रॕलीस प्रतिसाद देत होते. देशभत्तिची गीते लावली होती. तसेच राजगुरव कॉलनीमध्येही तिरंगा रॕली काढली होती.