पुणे

डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत तरुण जखमी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: निष्काळजीपणे कार चालवताना वळवून दुचाकीस्वार तरुणाला उडवत गंभीर जखमी करणार्‍या डॉक्टर महिलेवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहान नईमोद्दीन शेख (वय 47, सदाशिवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डॉ. पूजा घोष (रा. रहेजा व्हिस्टा, फेज-2, महंमदवाडी, पुणे) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 29 जून रोजी महंमदवाडी येथील घुले चौक ते दोजी पॅराडाईज रोडला घडला. डॉ. पूजा यांनी हुंदाई अ‍ॅक्सेस कार अचानक वळवून दुचाकीस्वार फरहान याला धडक दिली. यात फरहान जखमी झाल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक बिराजदार यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT