पुणे

टेमघर परिसरातील नदी, तलाव, बंधारे कोरडेठाक

अमृता चौगुले

खारावडे : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर व मुठा खोरे तसेच जिल्ह्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर धरणात (ता. मुळशी) एक टक्क्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची गळती बंद करण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे हे धरण वेळोवेळी रिकामे केले जात असल्याने धरणावर अवलंबून असलेली गावे व शेतीला पाणी टंचाईला गेल्या तीन ते चार वर्ष सामोरे जावे लागले होते. या वर्षी या धरणामध्ये मे महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हे धरण रिकामे झाले आहे.

आता पाऊस पडल्यावरच या धरणामध्ये पाणीसाठा होणार आहे. या धरणातील पाणी संपल्यामुळे या परिसरातील नदी, तलाव, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच परिसरातील गावांना शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
दोन ते तीन दिवसांत या परिसरात पाऊस पडला नाही तर पिण्याचे पाणीही दोन दिवसाआड सोडावे लागणार आहे. या भागात पाऊस लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT