पुणे

जागेच्या अतिक्रमणातून पुनावळेत गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा:   पुनावळे येथे एका व्यक्तिच्या जागेचे कम्पाउंड तोडून अतिक्रमण करीत, स्वतःचा मालकी हक्क दाखविल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ते 13 मे दरम्यान पुनावळे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकरलाल प्रेमाजी परमार (वय 50 रा. जनवाडी, पुणे) यांच्यासह सात जणांची मिळून पुनावळे येथे दोन एकर जागा आहे.

यामधील वीस गुठ्यांच्या जागेला असलेले कम्पाउंड आरोपी विकास मानकर, (रा. कस्पटे वस्ती) आणि रोहन पाडाळेसह आठ ते दहा इसमांनी तोडले आणि अतिक्रमण केले. तसेच स्वतःचे पत्र्याचे कंपाउंड या जागेवर बांधले आहे. म्हणून फिर्यादीने हिंजवडी पोलिस ठाण्यात शनिवारी (11 रोजी) फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT