पुणे

चाकण : महामार्गालगतचे सेवा रस्ते तुंबले

अमृता चौगुले

चाकण; पुढारी वृत्तसेवा: मागील दोन दिवसांपासून चाकण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी (दि.10) देखील चाकण भागात सकाळपासून श्रावणसरी बरसत आहेत. शहराच्या सखल भागात पाणी साचले असून अनेक ठिकाणी सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत नाही. परिणामी, सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

दरवर्षी मोठ्या पावसानंतर नाल्यांचा प्रवाह बंद होत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. चाकण पंचक्रोशीत मागील दोन दिवसांपासून होणार्‍या दमदार पावसाने सेवा रस्त्यावर साचणार्‍या पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी, वाहनचालकांना पाण्यातून वाट काढीत मार्गक्रमण करावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर तुंबणार्‍या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने 'ड्रेनेज'ची व्यवस्था तत्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाल्यांच्या सफाईबाबतचे पितळ उघडे
सेवा रस्त्यांच्या जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्याने घाण, कचरा नाल्यात साचून अनेक ठिकाणी हे नाले बंद झाले आहेत. काही दिवसांपासून होणार्‍या पावसाने रस्त्यालगतच्या नाल्यांच्या सफाईबाबतचे संबंधित प्रशासनाचे पितळ पुन्हा उघडे पाडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT