पुणे

चाकण : तरुणीवर बलात्कार; एकावर गुन्हा

अमृता चौगुले

चाकण : तरुणाने सोबत काम करणार्‍या तरुणीला लग्नाचे आमिष दाखून बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. भगवान बिरादार (रा. रुपीनगर, तळवडे, मूळ रा. मौजे जवळगा – साकोळ, ता. देवणी, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पीडित तरुणीने महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी एका कंपनीमध्ये काम करीत असताना तिची आरोपी भगवान याच्याशी ओळख झाली. आरोपीने याचा फायदा घेत फिर्यादीसोबत मैत्री वाढवून विश्वास संपादन करून हे कृत्य केल्याचे महाळुंगे पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT