पुणे

गावठी पिस्तूल, काडतूस बाळगणार्‍यास पौडला अटक

अमृता चौगुले

पौड : पुढारी वृत्तसेवा : गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणार्‍या नीलेश सुरेश देशमुख (वय 27, रा. पौड, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कॉन्स्टेबल साहिल शेख यांना पौड -कोळवण रस्त्यावर एक जण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली.

शेख यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिस पथकाने नदीकिनारी जाऊन नीलेश याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस आढळले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रॉकी देवकाते, चंद्रकांत सोनवणे, साहिल शेख या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT