पुणे

गड्या आपुला गावच बरा ! नोकरीवर परतण्यात कामगार वर्ग नाखुश

अमृता चौगुले

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा: आहेत. जनजीवन सुरळीत सुरू होत असताना कंपनीमधून बोलावणे आल्यावर पूर्वीचे कामगार नकार देत आहेत. कोरोना टाळेबंदीमध्ये अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामुळे कामगारांवर अचानक आभाळ कोसळले. पुढे काय करावे, असा प्रश्न पडला असताना अनेकांनी गावचा रस्ता धरला. अनेकांनी गावाकडे मिळेल ते काम काम केले. तर अनेकांनी छोटे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे शहरात पुन्हा कामावर यायला कामगार नकार देत आहेत.

शहरातील 30 टक्के कामगार गावाकडे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कंपनीमध्ये कमी कामगार संख्येवर काम सुरू आहे. छोट्या कंपन्यांना कमी कामगार संख्येत काम सुरू ठेवणे अवघड झाले आहे.

मित्रांकडून पुन्हा संपर्क
सोडून गेलेल्या कामगाराला पुन्हा कामावर बोलवावे यासाठी कंपनीतील मित्रांकडून संपर्क केला जात आहे. पुन्हा कामावर यावे यासाठी विनंती केली जात आहे. छोट्या कंपन्या कामगारांना पुन्हा बोलावण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. परंतु सोडून गेलेल्या कामगारांकडून गावीच चांगले आहोत, असे सांगितले जात आहे.

कमी कामगार क्षेत्र :

ऑटोमोबाईल स्टील
हॉटेल सुरक्षा
नवीन कामगार आणण्याचे आव्हान
नवीन कामगार पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान कंपनी संचालकांना पेलावे लागत आहेत.
कंपनीकडून बोलावणे

सध्या कंपनीकडून सोडून गेलेल्या कामगारांना बोलावणे येत आहे. पुन्हा नव्याने काम सुरू करण्याची विनंती केली जात आहे. परंतु सोडून गेलेले कर्मचारी गावी रमले असल्याने पुन्हा कामावर येण्यास नकार देत आहेत.

SCROLL FOR NEXT