पुणे

खानापूर येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: हवेली तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात आली. सिंहगड, पश्चिम हवेली भागातील खानापूर, मणेरवाडी, कुडजे, अगळंबे आदी गावांत पन्नास एकर क्षेत्रावर भातरोपांची यांत्रिक पद्धतीने लागवड करण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे व हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी शेतकर्‍यांना यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले, की पारंपरिक पद्धतीच्या भातलागवडीपेक्षा दोन पट अधिक उत्पादन यांत्रिक पद्धतीने मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमास शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांत्रिक पद्धतीच्या लागवडीसाठी ट्रे मध्ये भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. मंडल कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी सहायक नितीन ढमाळ, एस. डी. शिंदे, प्रवीण गाडे आदींच्या देखरेखीखाली खानापूर येथील नारायण जावळकर, प्रभाकर जावळकर, राजू जावळकर, हनुमंत वाघ, विठ्ठल जावळकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भातलागवड करण्यात आली.

SCROLL FOR NEXT