पुणे

खडकीत भरपावसात बर्निंग कारचा थरार

अमृता चौगुले

खडकी; पुढारी वृत्तसेवा: खडकी कँटोन्मेंट बोर्डामध्ये बुधवारी भरपावसात एका चारचाकीला आग लागल्याची घटना घडली. रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे- मुंबई रस्त्यावरून चाललेल्या चारचाकी (केए 02 एमपी 0061) मधून एक महिला व पुरुष आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन जात होते. खडकी पोलिस ठाण्यासमोर चारचाकी आली असता अचानक तिच्या बोनेटमधून धूर येऊ लागला.

चालकाने प्रसंगावधान राखत सुमारे 150 मीटर अंतरावर असलेल्या खडकी कँटोन्मेट बोर्डाच्या अग्निशामक दलाकडे धाव घेत याबाबत माहिती दिली. त्यानंतर, अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. पेट्रोल कारच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याने कारमधील बोनेटमधून धूर येऊ लागल्याचा प्राथमिक अंदाज दलाचे सुपरवायझर सतीश कांबळे यांनी वर्तविला.

SCROLL FOR NEXT