पुणे

खडकवासला धरणाचे जलपूजन

अमृता चौगुले

खडकवासला : अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांपासून भरून वाहत असलेल्या खडकवासला धरणातील जलसाठ्याचे आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार व खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तापकीर म्हणाले, "खडकवासला धरण शंभर टक्के भरून अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

खडकवासलापाठोपाठ इतर धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे." जलसंपदा तसेच पालिकेच्या अधिकार्‍यांसह भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बाजीराव पारगे, माजी नगरसेवक हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले, अश्विनी पोकळे आदी उपस्थित होते. शाळेला देवीची मूर्ती भेट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT