पुणे

कोथुर्णे घटना माणुसकीला काळीमा फासणारी’ : रुपाली चाकणकर

अमृता चौगुले

पवनानगर : कोथुर्णे येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. कोथुर्णे येथील पीडितेच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.

या वेळी हा खटल्यासाठी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांची निवड करण्याची मागणी ग्रामस्थांनी चाकणकर यांच्याकडे केली.
पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी आमच्या समोर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी चाकणकर यांच्याकडे केली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी ढोले पाटील, तहसीलदार मधुसूदन बर्गे, कामशेत पोलिस निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT