पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'जातीची गणना करताना वापरली जाणारी कोडिंगपद्धत बंद करून सरळ सरळ जातीची नोंद घेतल्यास कोणताच वाद राहणार नाही. कोडिंगऐवजी थेट जातीची नोंद केल्यास भविष्यातील अडचणी दूर होतील,' असा सूर पुण्यातील परिसंवादात ऐकायला मिळाला. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पुण्यातील पॉप्युलेशन रिसर्च सेंटर, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात 'पॉप्युलेशन मिथ ' विषयावर डॉ. कुरेशी बोलत होते. संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
'सिग्निफिकन्स ऑफ कास्ट सेन्सस' विषयावरील परिसंवादात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉ. पी. एम. कुलकर्णी, पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील डॉ. राजेश्वरी देशपांडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सच्या मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. भगत यांनी सहभाग घेतला.