पुणे

कामशेत : उकसानमध्ये शाळेची भिंत कोसळली

अमृता चौगुले

कामशेत : मुसळधार पावसामुळे उकसान गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीची एक भिंत कोसळली. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी नूतन इमारतीतील वर्ग खोल्यांमध्ये शाळा सुरू आहे. या ठिकाणी असलेली जुनी शाळा धोकादायक असून ती त्वरित पाडावी, अशी मागणीदेखील शिक्षकांनी यापूर्वीच केली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या जुन्या वर्ग खोल्यांच्या भवताली विद्यार्थी खेळत असतात. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली.

त्या वेळेस सुदैवाने इमारती जवळ कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. गावकर्‍यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून शिक्षकांच्या मदतीला येत याठिकाणी असणारा राडाराडा उचलला. मुख्याध्यापक राजू ढोरे की ज्या ठिकाणी भिंत कोसळली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास मनाई केली आहे.व मुलांना सुरक्षित ठिकाणी बसविण्यात आले. पूर्वीपासून ही भिंत धोकादायक असल्याने संबंधित खोल्यात वर्ग भरविण्यात येत नव्हते.त्यामुळे जीवितहानी झाली नाही. शासनाने त्वरित या ठिकाणची धोकादायक इमारत हटवावी, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT