File Photo 
पुणे

कांदलगाव भागात घरफोडीच्या घटनेने खळबळ

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील कांदलगावमध्ये चोरट्याने घरफोडी करून 50 हजार रुपयांची रक्कम पळवून नेली. ही घटना दि. 19 जुलै रोजी घडली. या प्रकरणी प्रमोद तानाजी जगताप (रा. कांदलगाव, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, एकाच ठिकाणी चोरट्याच्या हाताला रोकड लागली. इतर ठिकाणी त्यांचा डाव फसला.

या घटनेमुळे कांदलगावमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासमवेत दि.19 जुलै रोजी घराला कुलूप लावून मुक्कामी गेले होते. दुसर्‍या दिवशी घराची पाहणी केली असता, घरातील साहित्य, कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. लोखंडी कपाटाची दारे उघडलेली दिसली. त्यापैकी एका कपाटातील 50 हजार रोख रक्कम गायब झाल्याचे दिसले. त्यानुसार जगताप यांनी फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास इंदापूरचे पोलिस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नागराळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT