पुणे

ओबीसी आरक्षण निर्णयाचे वडगावात स्वागत

अमृता चौगुले

भाजपकडून पेढे वाटप
वडगाव मावळ : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे वडगाव शहर भाजपच्या वतीने फटाके वाजवून, पेढे वाटून स्वागत करण्यात आले. वडगाव मावळ येथील मावळ पंचायत समिती समोरील चौकात वडगाव शहर भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात माजी सभापती रेवती वाघवले यांना पेढा भरवून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे, विनायक भेगडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, नितीन कुडे, सुधाकर ढोरे, संभाजी म्हाळसकर, किरण भिलारे, विजय जाधव, प्रसाद पिंगळे, रवींद्र म्हाळसकर, शरद मोरे, समीर गुरव, शंकर भोंडवे, अतुल म्हाळसकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँगे्रसकडून आनंदोत्सव

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाचे मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल व वडगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने पेढे वाटून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष मयुर ढोरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, संध्या थोरात यांच्या उपस्थितीत बाजारपेठेत स्वागत रॅली काढून ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरासमोर नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.

यावेळी, नगरसेवक राजेंद्र कुडे, विशाल वहिले, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब खंडागळे, गोकुळ किरवे, सिद्धेश ढोरे, नितीन चव्हाण, शरद ढोरे, स्वप्नील मावळकर, सोनल आनंदे, भाऊसाहेब ढोरे, महेश तुमकर, राहील तांबोळी नितीन धोंगडे, संजय लोणकर, केदार बवरे, सुहास शेवकरी, सुधाताई भालेकर, जयश्री पवार, निलिमा शिंदे, नलिनी गायकवाड, लक्ष्मी गजाकोश, मिना शिंदे, अशोक आनंदे, भाऊ कराळे, अमित चौरे, स्वप्नील पावसकर, केदार बवरे, सोनू भालेराव, किरण ओव्हाळ आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT