पुणे

एसटीची ई-बस महिन्यातच लोकप्रिय; महामंडळाला मिळाले 10 लाख रुपये उत्पन्न

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या पुण्यातून सुरू झालेल्या इलेक्ट्रिक बससेवेला महिना झाला असून, या महिनाभराच्या कालावधीत पुणे-नगर-पुणे मार्गावर दोन गाड्यांच्या माध्यमातून 4 हजार 428 प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी महामंडळाला त्याद्वारे 10 लाख 21 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुणे-नगर मार्गावर 1 जून 2022 रोजी पहिली इलेक्ट्रिक एसटी सुरू केली.

या गाडीला आता महिना झाला आहे. या इलेक्ट्रिक गाड्यांना प्रशासनाने 270 रुपये तिकीट ठेवले आहे. एक ई-गाडी पुण्यातून सुटते तर दुसरी गाडी नगरहून सुटते. या दोन गाड्यांच्या माध्यमातून पुणे-नगर-पुणे चार फेर्‍या होतात. या गाड्यांना पहिल्याच महिन्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पुणे-नगर ई-एसटी…
पुण्याहून सुटलेली ई-एसटी
2 हजार 528 प्रवासी- 5 लाख 64 हजार रुपयांचे उत्पन्न (कालावधी-एक महिना)
नगरहून सुटलेली ई-एसटी – 1 हजार 900 प्रवासी – 4 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न

.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT