पुणे

‘एनआयआरएफ रँकिंग’ नेमकं असतं तरी काय?

अमृता चौगुले

विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांचा दर्जा समजावा, शैक्षणिक संस्थांनादेखील त्यांच्या त्रुटी समजून सुधारणा करण्याची संधी मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 'कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. त्यालाच म्हणतात… 'एनआयआरएफ रँकिंग'.

देशभरातील विविध विद्याशाखांचे शिक्षण देणार्‍या उच्च शिक्षण संस्थांचे अध्ययन अध्यापनासाठीची सामग्री, संशोधन, शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या पदवीधरांची स्थिती, बहि:शाल शिक्षण आणि सर्वसमावेशकता, संबंधित संस्थांबद्दलचे शैक्षणिक क्षेत्रातील एकूण मत अशा निकषांवर मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये तज्ज्ञांचे मत, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर याची पाहणी केली जाते आणि संबंधित मूल्यमापनाच्या आधारे देशभरातील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरविण्यात येते.

यामुळे होते काय?

राज्यातील शैक्षणिक संस्थांचा अलीकडील काळात दर्जा घसरतो आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये शिक्षणावरील खर्च वाढविणे, जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायत्तता देणे, जिल्हानिहाय विद्यापीठे स्थापन करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे, प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबरोबरच त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करणे गरजेचे आहे, त्यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढण्यास मदत होईल.

संस्थांना काय फायदा होतो?
विद्यार्थी रँकिंग पाहून प्रवेश घेतात, त्यामुळे प्रवेश वाढतात.
शैक्षणिक संस्थांना त्रुटी समजून त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते.
यूजीसी, रूसा आदी संस्थांकडून अनुदान मिळण्यास फायदा होतो.
स्वायत्तता मिळण्यास रँकिंगची मोठी मदत होते.
रँकिंगमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची संधी

विद्यार्थ्यांना काय फायदा होतो?
उत्तम रँकिंगच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असतो पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्ण शिक्षण, संशोधनामुळे उत्तम शिक्षणाची खात्री
अनुभवी, तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मिळते शिक्षण
चांगले रँकिंग असलेल्या संस्थेतील शिक्षणाचा नोकरी मिळवण्यासाठी फायदा शिक्षणासाठी आवश्यक शिष्यवृत्ती मिळताना रँकिंगचा विचार होतो

कोणकोणत्या गटात दिले जाते रँकिंग?
1) सर्वसाधारण गट 2) विद्यापीठे 3) महाविद्यालये 4) संशोधन संस्था 5) अभियांत्रिकी 6) व्यवस्थापन 7) फार्मसी 8) वैद्यकीय 9) दंतवैद्यकीय 10) विधी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT